गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३
येसाजीराव कंक। एक कणखर नेतृत्व
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक म्हणजे संस्कृतमधील गंगा राजवंशातून आलेले कुलीन मराठा होय>ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाऊल ठेवणारे सैनिक होते. ते गनिमी युद्धाच्या तंत्रात तज्ज्ञ होते.प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी मद्यधुंद हत्तीबरोबरही लढा दिला. शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून मृत्यूपर्यंत ते महाराजांचे एक निष्ठा मावळा होते. तसेच शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि सहकारी पण होते. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता "येसाजी कंक जलसागर" असे नाव दिले आह स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागते ते म्हणजे – शूर शिलेदार येसाजी कंक यांचे!येसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ते अतिशय बलदंड शरीराचे होते. शंभर हत्तीचे बळ असलेला माणूस अशी उपाधी येसाजी कंक यांना दिल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना येसाजींच्या सामर्थ्यावर किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग इतिहासाच्या पानावर आपल्याला सापडत>१६७६ साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले. आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतले होते. त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीस निघाले.>कुतुबशाहाकडून महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. महाराजांसोबत त्यांची काही विश्वासू आणी जवळची माणसे देखील होती. त्यात येसाजी कंक यांचा देखील समावेश होता. महाराजांनी दादमहालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वत:हून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मघापासून सतावत असलेला प्रश्न विचारला>राजाजी आपकी फौज तो बहुत बडी है लेकीन इसमें हाथी क्यूँ नही है?तेव्हा महाराजांनी येसाजी कंक यांच्याकडे बोट दाखविले. हत्तींना पण लोळविल असा हत्तीचे बळ असलेला हा माझा मावळा आहे. किती मोठा होता हा विश्वास ..कुतुबशाह म्हणाला हमे भी तो यह देखणे का मौका दिजीए>हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार केली गेली. सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणी मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला.>हत्तीच्या चालीची येसाजींना जणू अपेक्षा होती. त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवले. जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत धरून तो थरार पाहत होते. हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाई हत्तीच जिंकणार याची जणू सर्वाना खात्री होती. पण केवळ येसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून ती प्रत्येक नजर तेथे हजर होती>येसाजींनी काही वेळ हत्तीला खेळवले. समोरचा इवलासा माणूस आपल्याने बधत नाही हे पाहून हत्ती अधिकच आक्रमक होत होता. तो सर्वशक्तीनिशी येसाजींना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होता. पण येसाजी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळवत होते. अजून काही वेळ असाच गेला. येसाजी खेळवत होते आणी हत्ती खेळत होते>सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली. येसाजी जणू याच संधीची वाट बघत होते. यावेळेस त्यांनी स्वत:हून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली.>सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मातीत कमावलेल्या त्या बलदंड शरीराचा धक्का बसताच क्षणभर हत्तीही जागेवरून हलला. पण अचानक त्याने स्वत:ला सावरत येसाजींना सोंडीत पकडले. पण येसाजी हार मानतील ते कसले? त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडेतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला…>येसाजींनी घातलेला घाव हा त्या लढाईतला निर्णायक घाव ठरला. त्या जबरदस्त घावामुळे हत्तीचा सगळा जोश उतरला आणि त्याने सरळ बाहेर धूम ठोकली.सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. सर्वत्र येसाजींच्या नावाचा गजर होऊ लागला. येसाजी देखील सर्वाना अभिवादन करत होते.
येसाजीराव कंक। एक कणखर नेतृत्व
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक...
-
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक...
-
सागराचा राजा हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. ११ व्...
-
हे अवलंबून असायचे कि गड आहे कि दुर्ग आणि गड आहे तर तो भुईकोट (भुई=जमीन आणि कोट=संरक्षण) आहे किंवा डोंगराळ पण बहुतेक गडांचे बांधकाम हे एका व...