बुधवार, २१ जानेवारी, २०२६
धुरंधर
धुरंधरधुरंधरधुरंदर' मी बघितला मला आवडला.चित्रपटात खूप वाखाणण्याजोग्या बाबी आहेत तर काही मुद्दाम घुसडलेल्याही आहेत.त्या मास पब्लिकला कदाचित खटकणार नाहीत मात्र चित्रपट बघून नजर तयार झालेल्यांना खटकतील.
(प्रतिमा:आंतरजालावरून)
असो,रणवीर सिंग अंडरकव्हर एजंट आहे हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहिती झालेय. स्टोरीही जवळपास अनेक हॉलीवूड,बॉलीवूड चित्रपटांमध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये आपण बघितलीय. फक्त ह्या स्टोरीला देशप्रेमाचा तडका मारलेला आहे आणि तो चवदारही झालेला आहे.
कथा हि चाप्टरवाईज लिहिलेली आणि दाखवलेली आहे.त्यामुळे खरेपणाचा आभास निर्माण होतो. पाकिस्तानचा सेट आणि वातावरण निर्मितीसाठी कलादिग्दर्शकाला मार्क्स द्यायलाच हवेत. कलर ग्रेडिंग छान झालेय.रणवीरचा रॉ लुक जबरदस्त. अक्षय खन्नाने त्याचं काम चोख केलंय.त्याच्या मुलाचा जेव्हा खून होतो तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन लाजवाब. अर्जुन रामपालने आयएसआय एजंटचे काम खास म्हणता येणार नाही पण चांगले केलेय वास्तविक ते काम कोणीही करू शकलं असतं.सारा अर्जुन हि नवखी असली तरी ठीकठाक.राकेश बेदीचा दुतोंडी राजकारणी मस्त वठलाय.आर.माधवनची भूमिका विशेष लक्षात राहणारी झालीय.रणवीर सिंगला फक्त निरीक्षण करणे आणि संधी शोधणे यासारखी दृश्ये आहेत त्यामुळे संवाद कमी आहेत.ते बरेच आहे कारण त्याचा आवाज लूकला शोभेल असा खर्जातला नाही थोडा पातळ आहे.
अशा एक्शन चित्रपटात श्रवणीय संगीत नसले तरी ठीकठाक म्हणावे असे आहे. एकदा जरूर बघा, सिनेमॅटोग्राफी,साहस दृश्ये छान झालीय.
धुरंधर
धुरंधरधुरंधरधुरंदर' मी बघितला मला आवडला.चित्रपटात खूप वाखाणण्याजोग्या बाबी आहेत तर काही मुद्दाम घुसडलेल्याही आहेत.त्या मास पब्लिकला कदाच...
-
हे अवलंबून असायचे कि गड आहे कि दुर्ग आणि गड आहे तर तो भुईकोट (भुई=जमीन आणि कोट=संरक्षण) आहे किंवा डोंगराळ पण बहुतेक गडांचे बांधकाम हे एका व...
-
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक...
-
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या भविष्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करत असतात. आपल्या मुलीसाठी गुंतवणूक जर करायच...