Marathimahiti sandrbh
गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३
येसाजीराव कंक। एक कणखर नेतृत्व
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
स्वराज्याचे गडकिल्ले
हे अवलंबून असायचे कि गड आहे कि दुर्ग
आणि गड आहे तर तो भुईकोट (भुई=जमीन आणि कोट=संरक्षण) आहे किंवा डोंगराळ
पण बहुतेक गडांचे बांधकाम हे एका विशिष्ट पद्धतीनेच व्हायचे जसे कि 'गोमुखी' किंवा मुख्य आणि इतर दरवाजे ह्याच पद्धतीचे असायचे
ह्याचे कारण म्हणजे 'पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा'
राजपूत किंवा अगदी यादव आणि विजयनगर साम्राज्याचा ह्रासाचे एक मुख्य कारण म्हणजे गड
पूर्वी,जसे पौराणिक मालिकांमध्ये दाखवायचे , किल्ल्याचा दरवाजा हा थेट हल्ला किंवा तोफेच्या माऱ्याच्या थेट टप्प्यात असायचा!
त्यामुळे थेट दरवाजा तोडून शत्रूंना आत घुसायला जास्त वेळ लागायचा नाही आणि अर्थातच नंतरचा नग्न इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
अश्याच पद्धतीने अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा इतर विदेशी आक्रमकांनी हल्ले करून आपल्या आया- बहिणीची अब्रू लुटली आणि आपल्या भावांना हुतात्मा केले.
ह्यातूनच धडा घेवून युगप्रवर्तक छत्रपती महाराजांनी गडांची रचना हि गोमुखी करायला सांगितली (चित्र जोडले आहे)
ह्यामुळे गडाला एकप्रकारे असा आकार येतो कि चहोबाजूने फक्त तटबंदी च दिसते
त्यामुळे जिथे गडात प्रवेश करण्याचा मार्गच दिसत नाही तिथे दरवाज्यावर हल्ला करून आत प्रवेश करणे दूरच!
त्यामुळे प्रत्यक्ष हल्ल्या पेक्षा अगोदर दरवाजा शोधायलाच वेळ जायचा, तो पर्यंत गडावरील मराठे संदेश पोहोचवून ,बाहेरून मराठ्यांची तुकडी हल्ला करायचे आणि गनीम गडाबाहेरील आणि गडाच्या आतील फौजेच्या मधात भरडला जायचा.
तसेच गडाचा दरवाजा तोडायला जो आवश्यक runway लागतो तितकी सुद्धा जागा नसायची ह्या गोमुखी संरनचनेत!
त्यामुळे अर्थात गनिमांचा बराच वेळ खर्च कष्ट आणि ऊर्जा बिनकामाची खर्च व्हायची आणि त्यातूनच गडावरील मराठयांचा मारा असायचाच!
ह्याचा प्रत्यय फक्त एकाच गोष्टीवरून येतो कि रामशेज सारखा छोटा भुईकोट किल्ला घ्यायला मुघलांना ६ वर्ष झुंजावे लागले ते हि त्यांना लाच देऊन घ्यावा लागला,
अर्थात किल्लेदाराने योग्यच निर्णय घेतला होता, नंतर त्याच किल्लेदारांनी तोच रामशेज अगदी एका रात्रीत फक्त ३०० मावळ्यानिशी परत स्वराज्याच्या सेवेत आणला!
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
छत्रपती शिवाजी महाराज यांचा रणसंग्राम
थोडक्यात 👇👇
त्याने प्रथमच शिवाजीराजे हे नाव ऐकले (इ.स.१६५०-५५ दरम्यानच्या काळात).यानंतर पुढील जवळजवळ तीन दशके त्याने छत्रपतींचा झंझावाती पराक्रम बघितला.
जुन्नरची लूट,अहमदनगरवरील हल्ला,अफजलखान स्वारी व वध,सिद्दी जौहर स्वारी व पन्हाळगडावरून सुटका,कारतलबखानाचा पराभव,शायिस्तेखानाची स्वारी व लाल महालातील छापा,दिलेरखानाची फजिती,सुरतेची दोनदा लूट,जसवंतसिंहाचा पराभव,बाजी घोरपडेचा वध या सर्व प्रकरणांमुळे त्याला महाराजांच्या पराक्रमाची चांगलीच कल्पना आली होती.याचा कळस झाला तो मात्र आग्र्याचा दरबार,दरबारातील महाराजांचा 'तो' स्वाभिमानी बाणा व त्यानंतरचे राजकारण व सर्वांत शेवटी आग्र्याहून धाडसी सुटका.
यानंतर आग्र्याहून परतल्यानंतर चार वर्षांनी महाराजांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने हर हर महादेव चा उदघोष केला व त्यानंतर अशी घौडदौड केली की पुरंदरच्या तहाचे घाव,आग्र्यातील अपमान सारे सारे व्याजासकट धुवून निघाले.महाराजांच्या पराक्रमी भवानी तलवारीने पुन्हा त्यानंतर कधीही म्यान बघितली नाही.आग्र्यातील स्वतःची फजिती, पुरंदरच्या तहात मिळालेले २३ किल्ले गमावणे,सुरत व कारंजाची लूट,साल्हेरचा संग्राम व मुघलांचा दणदणीत पराभव,दिंडोरीची लढाई व पराभव यांसारख्या घटनांमुळे तो अस्वस्थ झालेला होता.
या पराक्रमाचा सर्वोत्कृष्ट कळसाध्याय म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपतीपद धारण करणे आणि दक्षिण दिग्विजय होय.याचप्रमाणे बहादूरखान,दिलेरखान यांचा केलेला पराभव होय.या सर्व घटनांमुळे तत्कालीन प्रबळ व वैभवशाली अशा हिंदवी स्वराज्याची व राजा शिवछत्रपतींच्या सामर्थ्याची सर्व सुलतानांना विशेषतः औरंगजेबाला पुरेपूर कल्पना आली होती.
जर औरंगजेब महाराज हयात असताना दख्खनमध्ये उतरता,तर त्याला त्याचा,त्याच्या लाल किल्ल्यासकट संपूर्ण मुघल साम्राज्याचा वसीयतनामा (वारसापत्र) तयार करूनच दख्खनमध्ये पाऊल टाकावे लागले असते.
जर तो राज्याभिषेक सोहळ्यानंतर दख्खनमध्ये ससैन्य आला असता,तर
त्याला महाराजांनी प्रत्यक्ष स्वराज्यात घुसू न देता स्वराज्याच्या सीमेबाहेरच बुकलले असते.
जरी तो स्वराज्यात आला असता,तर त्याला एकतर
मृत्यू स्वीकारावा लागला असता.
अंतिम पराभव स्वीकारून कैद पत्करावी लागली असती.
अन्यथा नेहमीसारख्या महाराजांच्या अचाट प्रयोगामुळे त्याची जबरदस्ती फजिती होऊन त्याला परत दिल्लीला परतावे लागले असते.थोडक्यात पराभवच नशिबी आला असता.
आपण जर स्वत:हून दख्खनेत मोहिमेवर गेलो,तर आपली जागतिक प्रतिष्ठा धुळीला मिळेल,दख्खनमध्ये तिची माती होईल,मुघल साम्राज्याला घरघर लागेल,तिला कुणीही वाली राहणार नाही,अशी भीती त्याला मनात होती.हे खरेच होते.कारण औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला कुणी समर्थ बादशहा लाभला नाही.औरंगजेबाच्या मृत्यूसोबतच मुघल साम्राज्याचेही पतन सुरु झाले.
औरंगजेबाची व छत्रपतींची पहिली व शेवटची भेट ही आग्य्राच्या दरबारात झाली.जर दुसरी भेट राज्याभिषेकानंतर झाली असती,तर ती केवळ रणांगणावरच झाली असती.शिवाय दोघेही आग्रा प्रकरणामुळे संतप्त झाले असल्यामुळे जी गाठ पडली असती,तर ती रणांगणावरच पडली असती.यावेळी महाराजांनी अद्वितीय रणकौशल्य दाखवून व अप्रतिम व्यूहरचना आखून नक्कीच औरंगजेबाचा पराभव केला असता.अवघ्या मराठ्यांनी मग अखिल हिंदुस्थानात नुसता हलकल्लोळ केला असता व उच्छाद मांडला असता.
या सर्व शक्यतांमुळे व मनातील भीतीमुळे औरंगजेबाने महाराज हयात असेपर्यंत दख्खनमध्ये यायचे टाळले.यामुळेच त्याने त्याच्या विविध सरदारांना आळीपाळीने स्वराज्यावर स्वारी करण्याचा आदेश दिला;मात्र तो प्रत्यक्ष आला नाही.महाराज निवर्तल्यानंतर मात्र दोन वर्षांनी स्वतः पाच लाखांच्या सैन्यासह आला व या दख्खनच्या मातीतच कायमचा गाडला गेला.
यातच महाराजांची थोरवी दिसून येते.
जय भवानी !! जय शिवाजी !! 🚩🚩
सुकन्या योजना भारत सरकार योजना
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या भविष्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करत असतात. आपल्या मुलीसाठी गुंतवणूक जर करायची असेल तर सुकन्या योजना ही खूपच लाभदायक अशी आहे.(Government scheme)
प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलगी जर असेल तर तिच्या शिक्षणाची,लग्नाची तसेच इतर कारणामुळे पालक चिंतेत असतात. या पालकांना दिलासा मिळण्यासाठी भारत सरकार काही योजना अमलात आणत असते. या योजनेच्या माध्यमातून पालकांना थोडाफार दिलासा मिळतो. मुलीच्या भविष्याबाबत सरकारने सुकन्या या योजनेची सुरुवात २०१५ साली सुरू केली. या योजनेत आपण गुंतवणूक करून मुदत पूर्ण झाल्यावर आपल्याला लाखो रूपये मिळतात. सरकार ने काढलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमअंतर्गत ही योजना राबवण्यात आली होती.(Government scheme)
मुलींच्या भविष्यासाठी या योजना राबवल्या होत्या. या योजनेसाठी पालकांना प्रोत्साहन देऊन गुंतवणूक केली होती. यामुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींचे स्वप्न देखील पूर्ण होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत सुकन्या समृध्दी चे खाते उघडले जाऊ शकते.
सुकन्या समृध्दी योजनेचे फायदे-
- या योजनेच्या खाते धारकांना व्याज हे ७.६% इतका चालू वर्षी देण्यात आला आहे.
- यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर सर्वाधिक व्याज मिळते.
- प्रत्येक वर्षी कमीतकमी १००० रू आणि जास्तीजास्त १.५ लाख रु जमा केले जाऊ शकतात.
- मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी ५० % रक्कम काढण्यास परवानगी देते.(Government scheme)
योजनेच्या नियम आणि अटी –
- आपण सुकन्या आणि समृध्दी योजनेचे खाते ओपन केल्यानंतर आपल्याला नियम आणि अटी पाळाव्या लागतात.
- आपले खाते जर बंद पडले आणि ते पुन्हा चालू करायचे असेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याला ५० रू दंड भरावा लागतो.
- या खात्यामध्ये आपल्याला कमी कमी रक्कम ठेवणे आवश्यक आहे.
- आपले खाते चालू केल्यापासून १५ वर्षे आपल्या २५० रू डिफॉल्ट तसेच ५० रू किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागते.(Government scheme)
मुदत पूर्ण झाल्यावर आपल्याला मिळतात –
- आपण २५० रू भरून खाते उघडले असल्यास पहिल्या महिन्यात ७५० रू भरावे लागतात. तसेच पुढील प्रत्येक महिन्याला १००० प्रमाणे वर्षाला १२००० रुपये भरावे लागतात.
- आपण जर मुलगी जन्मल्यावर खाते उघडले असल्यास मुलगी २१ वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्याला व्याज बरोबर ५,२७,४४५ रुपये मिळतील. यामध्ये आपला खूप फायदा होतो.
बुधवार, २५ जानेवारी, २०२३
कान्होजी आंग्रे
सागराचा राजा
हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. ११ व्या शताकातील शिलाहार घरण्यातील राजा भोज याने बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
मोहिमा:
कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी अल्जेरीन हे जहाज पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१३ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला, आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चांचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅन्सिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये रॉबर्ट कोवान इंग्लंडला परतले.त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
प्रमुख लढाया :
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.
मृत्यू :
कान्होजीच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून ये-जा करणाऱ्यास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निरपवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. कान्होजी सुद्दढ व प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्नी होत्या. त्यांना पाच मुलगे झाले.
४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी ह्यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली, पण त्यांना कान्होजींची सर आली नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आले.
येसाजीराव कंक। एक कणखर नेतृत्व
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक...
-
"येसाजी कंक" यांचा जन्म भूतोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक होते. कंक...
-
सागराचा राजा हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. ११ व्...
-
हे अवलंबून असायचे कि गड आहे कि दुर्ग आणि गड आहे तर तो भुईकोट (भुई=जमीन आणि कोट=संरक्षण) आहे किंवा डोंगराळ पण बहुतेक गडांचे बांधकाम हे एका व...